बालाजी वल्लाल यांच्या ‘माय गणेश’ कलाकृतीस पुरस्कार


नगर, (दि.13 सप्टेंबर) : कलाआकार फाऊंडेशन संचालित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइनच्या माध्यमातून आपली कला सादर करण्यासाठी आस्था नॅशनल ऑनलाईन आर्ट कॉप्युटीशन घेण्यात आली होती यामध्ये येथील शिल्पकार बालाजी वल्लाल यांनी जुन्या भंगार साहित्य वापरून त्यापासून तयार केलेल्या  ‘माय गणेश’ या कलाकृतीला अ‍ॅक्सिलंट अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे.

ही कलाकृती तयार करण्यासाठी टू व्हीलर गाडीचे पार्ट, सायकलीचे पार्ट, गाडीचे सायलेंसर, स्कूटरचे शीट,  कढाई,  अशा वेगळा प्रकारचे भंगार साहित्य वापरून माय गणेशा ही कलाकृती पूर्ण केली. गणेशोत्सवात तयार करण्यात आलेल्या ही कलाकृती पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी भेट दिल्या होत्या.

तसेच अनेकांनी या कलाकृतीचे कौतुक केले. या कलाकृतीला पुरस्कार मिळाल्याबद्दल बालाजी वल्लाल यांचे मखदुम सोसायटी, स्वागत अहमदनगर, इतिहासप्रेमी मंडळ आदि संस्थांसह सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post