नगर, (दि.07 सप्टेंबर) : केडगाव ते मेहेरबाबा हा रस्ता रहदारीसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. मेहेरबाबा हे एक अनेक भाविकांचे श्रद्धास्थान व एक धार्मिक स्थळ आहे. मात्र, या रस्त्याची अवस्था दैनिय झाली आहे. तातडीने बांधकाम विभागाने 15 दिवसात रस्त्याचे काम मार्गी लागले नाही तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा नगरसेवक मनोज कोतकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
केडगाव ते मेहेरबाबा हा रस्ता रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. मेहेरबाबा हे एक अनेक भाविकांचे श्रद्धास्थान व एक धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे या मार्गावरुन अनेक भाविक ये-जा सुरु असते. या मार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने छोटे-मोठे अपघात नेहमी घडत आहेत.
तसेच या रस्त्यावरून मोहिनीगर, आदर्शनगर, दूधसागर सोसायटी, शहरातून व उपनगरातून नागरिक मेहेरबाबाकडे जात असताना त्यांना रस्ता खराब असल्यामुळे अनेक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
तरी या रस्त्याचे काम येत्या 15 दिवसात पूर्ण करावे, अन्यथा आपल्या कार्यालयामध्ये सदर परिसरातील नागरिकांसह तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, याची दखल घ्यावी, अशी मागणी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे नगरसेवक मनोज कोतकर यांनी केले आहे.
Tags:
Ahmednagar