उपनगरातील संस्कृती लॉनजवळ घरफोडी


नगर, (दि.09 सप्टेंबर) : उपनगरातील तपोवन रस्त्यावरील संस्कृती लॉनजवळ घरफोडी करून 45 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे.

यासंबंधीची फिर्याद हिल्डा गिरीष साठे (वय 38 वर्षे, धंदा शिक्षक, रा. घर प्लॉट नं. 303, कृष्णा कॉम्पलेक्स, संस्कृती लॉनजवळ, तपोवन रोड, अहदनगर) यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर असे की, मंगळवार दि. 8 सप्टेंबर रोजी फिर्यादी हिल्डा साठे या त्याचे घराच्या दरवाजाला लॉक करून मामाच्या मयतीस गेले होते.

मात्र, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचे लॉक तोडून आत प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटातील 2 हजार रूपयांची रोख रक्कम, 15 हजार रूपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण, 10 हजार रूपये किमतीची एक तोळ वजनाची सोन्याची अंगठी असा 45 हजार रूपयांचा ऐवज स्वत:च्या फायद्याकरिता चोरून नेला आहे.

फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना. दीपक जाधव हे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post