अमिताभ गुप्ता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त; शिवदीप लांडे एटीएसचे उपमहानिरीक्षक


मुंबई, (दि.18 सप्टेंबर) :  राज्य शासनाने गुरुवारी राज्यातील रखडलेल्या आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. मुंबईतील ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडणारे शिवदीप लांडे यांच्याकडे महाराष्ट्र दaहशतवाद विरोधी पथकाच्या उपमहानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 



याशिवाय राज्यातील 30हून अधिक अधिकार्‍यांना नवीन जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने दोन आठवडयांपूर्वी वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या होत्या. तर बर्‍याच अधिकार्‍यांच्या बदल्या होणे बाकी होते. 



आज अखेर गृह विभागाने रखडलेल्या बदल्यांचे आदेश जारी केले आहे. पिपंरी चिचंवडचे माजी आयुक्त व बदलीच्या प्रतीक्षेत असलेले संदीप बिश्राई हे आता रेल्वेचे अपर पोलीस महासंचालक असतील.  तर राज्य सुरक्षा महामंडळाचे अपर पोलीस महासंचालक विनीत अग्रवाल यांच्याकडे गृह विभागाच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 



दहशतवाद विरोधी पथकाचे अधीक्षक विक्रम देशमाने यांच्याकडे ठाणे ग्रामीणचे अधीक्षकपद सोपवण्यात आले आहे. याशिवाय अन्य अधिकाऱयांच्या विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post