चुंभळीच्या कृषीकन्येचे शेतकऱ्यांना बीजामृत प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन


नगर, (दि.09 सप्टेंबर) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर, येथील कु.प्रतिक्षा देविदास हुलगुंडे या विद्यार्थीनीने चुंभळी ता.जामखेड येथील शेतकऱ्यांना बीजामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

बीजामृताचे फायदे, त्याचे बीजप्रक्रियेसाठी लागणारे प्रमाण व वापरण्याची पद्धत या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत विद्यार्थांसाठी राबविण्यात येणारा ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम स्वत:च्या गावातूनच राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांकडून गावातील शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे.

कृषी प्रात्यक्षिकासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. एन. रसाळ, कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ. बी. टी. कोलगणे, विस्तार विभाग प्रा. डॉ. एस. एस. खांदवे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. डी.वाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी नगरसेवक महेश निमोणकर कृषी अधिकारी बहीराव, गावचे सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशिल शेतकरी मल्हारी गडदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post