सात्रळ परिसरात बिबट्या जेरबंद


नगर, (दि.20 सप्टेंबर) :  भक्ष्याच्या शोधात आलेला दीड वर्षाचा नर बिबट्या वनविभागाच्या पिंजर्‍यात जेरबंद झाला आहे.  

यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.  राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील पलघडमल वस्तीजवळ शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला.

वनक्षेत्रपाल पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी वनपाल सचिन गायकवाड, वनरक्षक समाधान चव्हाण,वनरक्षक शंकर खेमनर, वनकर्मचारी लक्ष्मण किणकर, मुरलीधर हारदे, सुभाष घनदाट, बाळू हारदे, मुसा पठाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन जेरबंद बिबट्याला म्हैसगाव नर्सरीत हलवले.

Post a Comment

Previous Post Next Post