नगर, (दि.04 सप्टेंबर) : शहरातील लक्ष्मी कारंजा चौकाजवळील महाजनगल्ली समोरचा रस्ता गुरुवारी दुपारच्या सुमारास खचला. खचलेल्या रस्त्यामध्ये अडकून वाहनांचे नुकसान होऊ नये म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते अनिलकुमार पुंड यांनी त्यासभोवती दगडे मांडत धोक्याचा इशारा देशारा लाल ध्वजही लावला.
चेंबर असलेल्या भागाजवळील हा खचलेला भाग तातडीने दुरूस्त करण्याची तसदी महानगरपालिकेने न घेतल्यास चेंबर दुरूस्तीचा अतिरिक्त खर्चही महापालिकेला सोसावा लागेल. सध्या शहराच्या विविध भागामधील रस्ते उखडले जाऊ लागले असून रहदारीचा रस्ता खचण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी यांनी रस्त्यांची पाहणी करून तातडीने दुरूस्ती करण्याची पावले उचलणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नगरकरांमधून उमटू लागल्या आहेत.
Tags:
Ahmednagar