नगर, (दि.03 सप्टेंबर) : नगर शहरात आज सायंकाळी 6 च्या दरम्यान, जोरदार पावसाने हजेरी लावली. वार्याचा वेग देखील जोरदार असल्याने काही ठिकाणी फेक्स बोर्ड उडुन गेले आहेत. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने नगारीकांची चांगलीच पळापळ झाली.
शहरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. तर नालेगाव, गांधी मैदान, दिल्लीगेट, कोर्ट गल्ली, माळीवाडा आदी ठिकाणी पाणी साचल्याने नागरीकांचे वाहने बंद पडल्याचे चित्र होते.
गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सायंकाळी शहरासह तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने पाणी आसंडून वाहत होते.
यंदा पावसाने नगर जिल्ह्यावर मोठी कृपा केली आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस जिल्ह्यात नोंदवला गेला आहे. जिल्हयात जून ते ऑगस्ट दरम्यान सरासरी 175 टक्के पाऊस झाला आहे. पावसामुळे जिल्हयातील धरणे भरली आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणारे मुळा धरण शंभर टक्के भरले आहे. पाणी पातळी वाढल्याने उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यंदाच्या वर्षी पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी परस्थिती सध्या तरी आहे.
Tags:
Ahmednagar