मराठा महासंघ व डॉ.गोरे डेन्टल हॉस्पिटलच्या वतीने
शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
नगर, (दि.06 सप्टेंबर) : नगर तालुका अ.भा. मराठा महासंघ व डॉ.गोरे डेन्टल हॉस्पिटलच्या वतीने आदर्श शिक्षक स्व.तुकाराम गोरे गुरुजी स्मृतिप्रित्यर्थ शिक्षण क्षेत्रात योगदान देऊन सुसंस्कारित समाज घडविणार्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. छाया मुन्ने (मिरजगाव मुलींची शाळा, ता. कर्जत), अलका मेढे (शारदा मंदिर, नगर), जयराम सातपुते (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिसगाव), भरत कांडेकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांदूर विहिरे ता. शेवगाव), प्राचार्य चंद्रकांत चौगुले (अहमदनगर माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, यतिमखाना नगर) या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माळीवाडा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये नियमांचे पालन करुन हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला. डॉ. सुदर्शन गोरे व नगर तालुका मराठा महासंघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते सदर पुरस्कार वितरीत करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. सुदर्शन गोरे म्हणाले की, आजोबा शिक्षक असल्याने घराला एक वेगळी शिस्त होती. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले असून, त्यांनी आपले विविध क्षेत्रात नांवलौकिक कमवला आहे. त्यांचा आदर्श समोर ठेऊन एक आदर्श समाजाची निर्मिती करणार्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणार्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात अनेक शिक्षक निस्वार्थ भावनेने आपले योगदान देत असतात. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक हा समाज घडविणारा घटक आहे. कोरोनाच्या काळात देखील शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडून कर्तव्य बजावले तर ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे दिले.
शिक्षक या घटकावर भवितव्य अवलंबून असून, त्यांच्या ऋण न फेडता येणारे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या संकटकाळात छोटेखानी कार्यक्रम घेऊन शिक्षकांचा सन्मान करुन भावी वाटचालीस एक प्रेरणा मिळाली असल्याची प्रतिक्रिया पुरस्कारार्थींनी व्यक्त केली. यावेळी उत्तम कांडेकर, अय्युब शेख, प्रशांत त्रिंबके, मंगल कांडेकर, सुखेकिणी राऊत आदि उपस्थित होते.

Tags:
Ahmednagar