नगर, (03 सप्टेंबर) : शहर पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा बुधवारी (दि.2) खंडीत झाल्यामुळे शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे आज (दि.3) शहर पाणी वाटपाच्या मध्यवर्ती भागास पाणीपुरवठा होणार नसल्याचे महानगर प्रशासनाकडून पत्रकाद्वारे कळविण्यात आले. उद्या पाणीपुरवठा नेहमीच्या वेळेत होणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारे मुळा धरण ओसंडून वाहू लागले आहे. अशाही स्थितीत नगर शहराच्या मध्यभागात मात्र पाण्याचा ठणठणाट आहे. पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नगरकरांना ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
शहरात पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा बुधवारी खंडीत झाल्यामुळे शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे आज मध्यवर्ती शहरात पाणीपुरवठा झाला नाही.
आज सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळेरोड, तोफखाना, नालेगांव, कापड बाजार, आनंदी बाजार आदी भागात पाणीपुरवठा झाला नाही. उद्या दि.4 रोजी नेहमी प्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
तसेच उद्या दि.5 रोजी रोटेशननुसार पाणी वाटप करण्यात येणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये झेंडीगेट, रामचंद्र खुंट, हातमपुरा, कोठला परिसर, माळीववाडा या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार असून,या भागात शनिवारी दि.5 पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags:
Ahmednagar