वारुळाचा मारुती मंदिर परिसरात कुस्तीपटूच्या हस्ते वृक्षरोपण


नगर, (दि.08 सप्टेंबर) : नालेगाव येथील वारुळाचा मारुती मंदिर परिसरात कुस्तीपटू पै. मयूर जपे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष तथा निसर्ग व पर्यावरण मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष पै. नाना डोंगरे, नगर तालुका तालिम संघाचे सचिव पै.बाळू भापकर, स्वराज्य कामगार संघटनेचे सचिव पै.सुनिल कदम, कुस्ती मल्ल विद्येचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जपे, सवाली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, अ‍ॅड. राजेश म्हस्के, बाहुबली वायकर, मनोज बाबणे, अशोक पांगरे आदि उपस्थित होते.  


पै.नाना डोंगरे म्हणाले की, चांगल्या आरोग्यासाठी शुध्द हवेची गरज असते. झाडांची बेसुमार कत्तल होत असल्याने शुध्द हवा मिळणे देखील कठिण झाले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावणे हा एकमेव पर्याय असून, युवकांनी या चळवळीत योगदान देण्याची गरज आहे. 
 
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन मोलाचे असून समाजातील सर्व घटकांना वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत सदैव जागृक राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post