अहमदनगर जिल्ह्यात आज ७०३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

आतापर्यंत ३१ हजार १९१ रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.३७ टक्के

 


नगर, (दि.19 सप्टेंबर) : अहमदनगर  जिल्ह्यात आज तब्बल एक हजार ५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार १९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७०३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४३३८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १११, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२२ आणि अँटीजेन चाचणीत ३७० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४८,  संगमनेर ०३, नगर ग्रामीण १२, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०४, नेवासा ०२, श्रीगोंदा १०, पारनेर ०१, अकोले ०१, राहुरी ०४, शेवगाव २०, जामखेड ०३ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २२२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ६२, संगमनेर १२, राहाता १६, पाथर्डी ११, नगर ग्रामीण १४, श्रीरामपुर १४, नेवासा १३, श्रीगोंदा ०४, पारनेर १२, अकोले ०४, राहुरी ३७, शेवगाव ०३, कोपरगाव ०३, जामखेड १६ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३७० जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा १९, संगमनेर १९, राहाता ५५, पाथर्डी ३६, नगर ग्रामीण ३०,  श्रीरामपूर १२,  नेवासा १७,  श्रीगोंदा ०५, पारनेर १६, अकोले ४१, राहुरी ३२, शेवगाव ०१, कोपरगाव ३९, जामखेड ३१ आणि कर्जत १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आज तब्बल १०५५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामध्ये, मनपा ३५२, संगमनेर ३२, राहाता ११८, पाथर्डी ३४, नगर ग्रा ९६, श्रीरामपूर ७१, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा ५८, श्रीगोंदा ३३, पारनेर ४१, अकोले ३३, राहुरी ६८, शेवगाव १०, कोपरगाव ३४, जामखेड ३३, कर्जत २५ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या : ३११९१

*उपचार सुरू असलेले रूग्ण : ४३३८

*मृत्यू : ५८६

*एकूण रूग्ण संख्या:३६११५ 

 (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक: १९ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वा 


सार्वजनिक ठिकाणी संपर्क आणि गर्दी टाळा

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावूनच बाहेर पडा

  

"प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या"

 

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

Post a Comment

Previous Post Next Post