राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेली उपक्रमशील आदर्श शिक्षिका हेमा जगदीश कोंगे या इंग्रजी शाळेतील अनुभवी व प्रयोगशील शिक्षिका असून या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जगात विद्यार्थी घडविण्याकरिता त्या नेहमीच फक्त फळा व खडू यांचा उपयोग न करता वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण प्रयोगशील शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थी घडविण्याचे कार्य त्या करीत आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शाळेतील अभ्यासक्रमावरील नाविण्यपुर्ण, प्रयोगशील व विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता विविध उपक्रम राबविले व तसेच त्यांचे इनोव्हेटिव्ह सायंटिफिक रिसर्च प्रोफेशनल, मलेशिया या आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थेमार्फत शैक्षणिक व वैज्ञानिक उपक्रमाचे कार्य सुरू आहे.
त्या इंग्रजी माध्यमाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये जे क्रमिक अभ्यासक्रम शिकविले जातात त्या व्यतिरिक्त जागतिक पातळीवरील अभ्यासक्रम व विविध मॉड्यूल ऑनलाइन कोर्सेस या सर्व अत्याधुनिक तंत्राचा वापर करून विद्यार्थी घडविण्याचे त्यांचे कार्य सुरू आहे. सध्या त्या सोसायटी ऑफ इनोव्हेटिव्ह एज्युकेशन्यालीस्ट अँड सायंटिफिक रिसर्च प्रोफेशनल, चेन्नई तामिळनाडू या नामांकित संस्थेमध्ये प्रोग्राम डेव्हलपमेंट एक्झिकेटीव्ह म्हणून कार्यरत आहेत.
तसेच कोंगे यांना इनोव्हेटिव्ह सायंटिफिक रिसर्च प्रोफेशनल मलेशिया या आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थेने त्यांना मागील वर्षी 2019 मध्ये इनोव्हेटिव्ह अॅण्ड डेडिकेटेड टीचर हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांची एज्युकेशन बोर्ड मेंबर कन्सल्टंट म्हणून निवड केली. तसेच त्यांच्या या कार्याची दखल घेत अहमदनगर देवांग कोष्टी समाजाने देखील त्यांना विशेष शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. या सर्व कार्यात त्यांना त्यांचे पती जगदीश लक्ष्मीकांत कोंगे यांच्या प्रेरणेनेच त्या शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करून यशाचे शिखर गाठू शकल्या असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.