आरसा लघुपट 'हंगामा प्ले' ओटीटी प्लँटफॉर्मवर प्रदर्शित


नगर, (दि.06 सप्टेंबर) : सध्या लॉकडाऊनमुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मला प्रचंड मागणी आहे. त्यातून अनेक नवे विषय, नवीन प्रवाह आणि नवी मांडणी समोर येत आहे. येथील आशिष निनगुरकर यांनी लिहीलेला 'आरसा' हा सामाजिक लघुपट नुकताच 'हंगामा प्ले' या ओटीटी प्लँटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

'आरसा' ही एका मुलीची गोष्ट आहे.ज्या मुलीच्या आईला कॅन्सर असतो.अशावेळी ती आईला वचन देते.ते वचन पूर्ण करतांना तिचा प्रियकर तिला सोडून जातो. खरंतर आपले आयुष्य आरश्यासारखे असते.'जसे दिसते तसे नसते',म्हणूनच 'जगात जर आरसे नसते,तर काय बिघडले असते. माणसाचे डोळेच जर स्वच्छ लखलखीत असले असते. तर त्याच्या आत त्याला डोकावता आले असते.' असा अनमोल संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे.

या लघुपटाचे दिग्दर्शन गणेश मोडक यांनी केले असून संकलन हर्षद वैती यांचे आहे. छायांकन योगेश अंधारे यांचे असून या लघुपटात श्वेता पगार, चैत्रा भुजबळ, संकेत कश्यप,गीतांजली कांबळी,वैष्णवी वेळापुरे व डॉ. स्मिता कासार यांनी भूमिका केल्या आहेत.आशिष निनगुरकर यांनी या लघुपटाचे लेखन केले असून  'काव्या ड्रीम मूव्हीज व सौ.किरण निनगुरकर' यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. या लघुपटासाठी  निर्मिती व्यवस्थापक म्हणून प्रतिश सोनवणे, स्वप्निल निंबाळकर, सिद्धेश दळवी, प्रदीप कडू,अभिषेक लगस, सुनील जाधव,अजित वसंत पवार यांनी काम केले आहे. या लघुपटाचे  सहनिर्माते अशोक कुंदप व आशा कुंदप हे आहेत.

'आरसा' हा लघुपट कॅन्सर रोगाबद्दल जनजागृती करणारा आहे.'आरसा' लघुपटाने  याअगोदर विविध फेस्टिवलमध्ये नामांकने व पुरस्कार पटकावले आहेत.तसेच सर्व फेस्टिवलमध्ये या लघुपटाच्या स्क्रिनिंगला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आरसा लघुपट  'हंगामा प्ले'च्या https://www. hungama.com/movie/aarsa/57053344/ या लिंकवर पाहू  शकता.

Post a Comment

Previous Post Next Post