वृक्षारोपण व संवर्धनही लोकचळवळ व्हावे : महापौर बाबासाहेब वाकळे

मध्यमंडल भाजपाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी 

यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण 


नगर, (दि.14 सप्टेंबर) : दिवसेंदिवस पर्यावरणात होत असलेल्या बदलामुळे त्यामुळे वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे मनुष्याच्या आरोग्यवरही परिणाम होत आहे. यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची खरी गरज आहे. प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन एक झाड लावून आपण कर्तव्य बजावावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त शहरामध्ये भाजपाच्या वतीने सात दिवस सामाजिक उपक्रम राबविणार आहे. यामध्ये वृक्षारोपण, फळवाटप, अन्नधान्य वाटप, दिव्यांगांना वस्तू वाटप व स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबविले जातील. 

 

भाजपा मंडलाध्यक्ष अजय चितळे व नगरसेविका सोनाली चितळे यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण व संवर्धन व्हावे, यासाठी जनजागृती करणार आहे. वृक्षारोपण व संवर्धन ही लोकचळवळ व्हावी, यासाठी प्रत्येकाने आपले काम केले पाहिजे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा मध्य मंडलाध्यक्ष अजय चितळे व नगरसेविका सोनाली चितळे यांच्यावतीने वृक्षारोपणाचा
शुभारंभ करताना महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, भाजपा शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे, माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी, मनोज ताठे, अजय ढोणे चितळे सर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post