काळाची पावले ओळखून कॅशलेस सुविधेचा निर्णय : चेअरमन अनिल गांधी

भारतातील पहिली कॅशलेस सहकार 

संस्था होण्याचा मान पोस्टल क्रेडीट सोसायटीला 


नगर, (दि.01 सप्टेंबर) : सहकाराचा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हयाला ओळखले जाते. अहमदनगर पोस्टल सोसायटी ही स्वातंत्र्य पुर्व काळात 30 ऑगस्ट 1920 मध्ये म्हणजे शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था असून, या संस्थेत अनेक मान्यवरांनी काम करुन पतसंस्थेच्या भरभराटीत हातभार लावला आहे. भारतातील पहिली कॅशलेस सहकारी संस्था होण्याचा मान पोस्टल क्रेडीट सोसायटीला मिळाला आहे. ही सेवा 1 सप्टेंबरपासून सुरु करण्यात आली असल्याची माहिती अहमदनगर पोस्टल डिव्हीजन को-ऑप क्रेडीट सोसायटीचे चेअरमन अनिल गांधी यांनी दिली.

सोसायटीने काळाची पावले ओळखून वेळोवेळी आपल्या कामकाजात बदल करत सभासदांना सेवा दिली आहे.  आताही संपूर्ण व्यवहार कॅशलेसचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांचा सभासदांना फायदा होणार आहे. आधुनिक काळाची पावले ओळखून संस्थेने हा निर्णय घेतला आहे. देशातील पहिली कॅशलेस संस्था होण्याचा मान पोस्टल सोसायटीने मिळविला असुन काळाची पावले ओळखून ववाटचाल सुरु आहे. डाक खात्यातील कर्मचारी हे या संस्थेचे सभासद आहेत. सोसायटीचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य आहे.  

शतक महोत्सव साजरा करत असलेल्या अहमदनगर पोस्टल डिव्हीजन को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या कॅशलेस सेवेचा शुभारंभ प्रवर डाक अधिक्षक जी.टी.भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी चेअरमन अनिल गांधी, माजी चेअरमन दत्तात्रय जासूद, संचालक अमित कोरडे, उस्मान शेख, सलिम शेख, आनंद भोंडवे, दिपक जसवाणी, सचिन अस्वर, प्रमोद कदम, महेश तामटे, निसार शेख, प्रताप कारखिले, मिलिंद भोंगले, नितीन वाघ आदि उपस्थित होते.

याप्रसंगी अमित कोरडे म्हणाले, संस्थेने शतक महोत्सव वर्ष लक्षात घेऊन यापूर्वीच 1 जानेवारी 2020 पासून कर्जाच्या व्याजदर अर्धा टक्का कमी करुन 10.5% केलेला आहे. संस्थेची आर्थिक परिस्थिती, सामाजिक कार्य, ऑडीट वर्ग, सभासदांच्या ठेवी, दिलेले कर्ज व थकबाकीचे प्रमाण, प्रति कर्मचारी व्यवसाय, कामकाजाची पद्धत, यासह एकूण 65 निकषावर खरे उतरत संस्थेला मागील वर्षी ब्ल्यू रिबन बॅको हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.  आता सुरु करण्यात आलेल्या कॅशलेस सुविधेचा सभासदांनी फायदा करुन घ्यावी, असे आवाहन यावेळी केली.

याप्रसंगी प्रवर डाक अधिक्षक जी.टी.भोसले यांनी सोसायटीच्या उपक्रमांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या कॅशलेस निर्णयाबद्दल संस्थेचे सभासद संतू नरवडे, मोहन पालेकर, सुनिल भागवत, देवेंद्र शिंदे, किशोर नेमाणे, रामेश्‍वर ढाकणे, दिलीप खरात, बलराम दाते, महेश दांगट, जगदीश पेन्लेवाड, अकिल शेख, जावेद शेख, धनंजय दैठणकर, अविनाश आढाव, महमंद शेख, सुनिल कुलकर्णी, रमजान  पठाण, अरविंद वालझाडे, इरफान पठाण, बळी जायभाय, अखिल शेख, जय मडावी, अर्जुन जटाले आदिंसह सभासदांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post