शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे : सभापती कोकाटे

नगर तालुक्यात लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात

 


चिंचोडी पाटील, (दि.12 सप्टेंबर) : नगर तालुक्यातील राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नगर तालुक्यात लाळ खुरकूत लसीकरणाची सुरवात १ सप्टेंबर पासून सुरू झाली असून १५ ऑक्‍टोबरपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती सभापती कांताबाई कोकाटे यांनी दिली. या कार्यक्रमांतर्गत जनावरांना लसीकरण करायचे आहे व त्याची नोंद या प्रणालीवर घ्यायची आहे असे कोकाटे यांनी सांगितले.
 

या लसीकरणाचा शुभारंभ चिचोंडी पाटील येथे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले व सभापती कांताबाई कोकाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सर्व पशुवैद्यकीय डॉक्टरांनी खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टराना या मोहिमेमध्ये सहभागी करून घ्यावे व ग्रामस्तरावर ग्रामसेवक तलाठी यांच्या मदतीने योजनेस व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी द्यावी व जनावरांना टॅगिंग करून लसीकरण करून घ्यावे असे मत यावेळी संदेश कार्ले यांनी व्यक्त केले.
 

त्याचबरोबर जे पशुपालक जनावरांना टॅग मारून घेणार नाहीत अशा जनावरांचे लसीकरण करण्यात येणार नाही. तसेच भविष्यात टंचाई परिस्थिती उद्भवल्यास छावणी मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल व बाजार समितीमध्ये खरेदी-विक्रीसाठी बंदी घालण्यात येईल अशा जनावरांना शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्वांनी या योजनेचा फायदा करून घ्यावा असे तहसीलदार उमेश पाटील यांनी पंचायत समितीच्या झालेल्या सभेमध्ये आव्हान केले आहे.
 

यावेळी सभापती कांताबाई कोकाटे, शिवसेनेचे नेते इंजि.प्रविण कोकाटे, सरपंच अंजनाताई पवार, उपसरपंच महेश जगताप, सोसायटीचे माजी चेरमन दिलीप पवार, अमोल कोकाटे, मारुती ससे, अशोक कोकाटे, संदीप काळे, पशुधन विकास अधिकारी  तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते

 

Post a Comment

Previous Post Next Post