चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून : गुन्हा दाखल


नगर, (दि.14 सप्टेंबर) :  चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीच्या गळ्यावर व डोक्यात मारहाण करुन तिला ठार केल्याच्या आरोपीवरून पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी कृष्णा जाधव यास अटक करण्यात आली. टाकळीभान येथील कृष्णाचा कोंढवा (पुणे) येथील वर्षा हिच्याशी 27 डिसेंबर 2019 रोजी विवाह झाला. 8 सप्टेंबरला वर्षाचा मृत्यू झाला. याबाबत तिच्या माहेरचे नातेवाईक महेश जगन्नाथ ढवळे (कोंढवा) यांनी कृष्णाच्या विरोधात फिर्याद दिली.

चारित्र्यावर संशय घेऊन वर्षाचा पतीकडून छळ केला जात होता. पतीनेच तिच्या गळ्यावर व डोक्यावर कशानेतरी मारहाण करुन तिला जीवे ठार मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक मसूद खान यांनी तपास करुन कृष्णाच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.

Post a Comment

Previous Post Next Post