युवकांचे प्रश्‍न मार्गी लावून मोठे संघटन उभे करणार : प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे

 भाजप युवा मोर्चाची नगर शहरजिल्हा कार्यकारिणी जाहीर

 

नगर, (दि.13 सप्टेंबर) : भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाने दिलेले पद ही जबाबदारी असते, त्यामुळे आपणास मिळालेल्या पदाचा उपयोग करुन सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम करावे. काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षात मोठा होत असतो. पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम नूतन पदाधिकार्‍यांनी करावे. यापुढील काळात भाजपा युवा मोर्चा आक्रमक राहून युवकांचे प्रश्‍न मार्गी लावून मोठे संघटन उभे करण्यावर भर देणार आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रस्त्यावर उतरुन संघर्षाची भुमिका आपण घेणार आहोत. यासाठी नूतन पदाधिकार्‍यांनी आपआपल्या पदाच्या माध्यमातून युवकांचे संघटन करुन भाजपा युवा मोर्चाचे कार्य करावे. पुढील काळात युवा मार्चाच्यावतीने  पक्षीय कार्यक्रमांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसा निमित रक्तदान व प्लाज़्मा दानाचा उपक्रम तसेच पं. दीनदयाल उपाध्याय यांचे जयंती निमित्त वृक्षारोपण, फळे वाटप. गांधी जयंती निमित्त प्लास्टिक बंदी जनजागरण कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या बैठकीत सचिन तांबे बोलत होते. बैठकीस भाजपाचे शहराध्यक्ष भैय्या गंधे,  मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले, अ‍ॅड.विवेक नाईक, नरेंद्र कुलकर्णी, गणेश नन्नवरे, उमेश साठे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष भैय्या गंधे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळले आहे. त्यांच्या धाडसी निर्णयामुळे आज देश जागतिक पातळीवर दबदबा निर्माण केला आहे. देशातील सर्वस्तरातील लोकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून त्यांचे जीवनमान उंचविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काम करावे. त्यांना सर्वोतोपरि सहकार्य आपण करु, असे सांगितले.

याप्रसंगी महेश तवले म्हणाले, भाजप युवा मोर्चाचे नगरमध्ये चांगले काम आहे, युवक, विद्यार्थी यांच्या प्रश्‍नांबाबत युवा मोर्चाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. युवा मोर्चात केलेल्या कामाची दखल घेऊन विविध पदे देण्यात आली आहे. पदाच्या माध्यमातून आपल्या कामाने ते वेगळा ठसा उमटवितील आहे. राज्याचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा राम शिंदे, खासदार डॉ सुजय विखे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी खासदार दिलीप गांधी, प्रदेश कार्यकारणी सदस्य अ‍ॅड.अभय आगरकर, प्रा.भानुदास बेरड आदींच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चाची ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली असल्याचे सांगितले.

याप्रसंगी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ती पुढीलप्रमाणे: उपाध्यक्ष - अभिषेक शिंदे, स्वप्नील दगडे, विकास झिजुंडे, राजू सातपुते, राकेश भाकरे, किरण जाधव, सिद्धेश नाकाडे. चिटणीस - वैभव झोटिंग, डॉ.दर्शन करमाळकर, सुजित खरमाळे, यश शर्मा, पियुष जग्गी, आनंद निंबाळकर, रवी गुडा, अभिषेक वराळे, अंकुश भापकर. प्रसिद्धीप्रमुख - अभिजित सोनवणे, सहप्रमुख - कार्तिक तगारे, सोशल मिडिया प्रमुख - सुबोध रसाळ, सहप्रमुख - आदेश गायकवाड, युवती विभाग संयोजक प्रमुख - गुणाली मुथा, कार्यालयीन प्रमुख - दिपक उमाप, सहप्रमुख - अजित कोतकर. विद्यार्थी विभाग संयोजक - आकाश सोनवणे, सहसंयोजक - आशिष देशमुख, मयूर पुरोहित, संपर्कप्रमुख - अभिजित चिप्पा, सहप्रमुख - सुमित देवतरसे. कार्यकारिणी सदस्य - अ‍ॅड.आशिष पोटे, अ‍ॅड.हरिष कल्याणी, रुपेश वर्मा, लक्ष्मीकांत तिवारी, पियुष संचेती, नितीन वरताळे, पांडूरंग घोरपडे, संकेत तावरे, साहिल शेख, पवन चुटके, आशिष आव्हाड, प्रफुल्ल गोरे, निलेश आव्हाड, रमेश थडकिया, रोहित राज पुरोहित आदिंची नियुक्ती करण्यात आले.

प्रास्तविक उमेश साठे यांनी करुन सर्वांचे आभार मानले. नूतन पदाधिकार्‍यांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post