रायकर कुटुंबाला शासनाने मदत करावी : वाडेकर


राहुरी, (दि.05 सप्टेंबर) : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पांडुरंग रायकर या तरुण पत्रकाराचा बळी गेला आहे. या घटनेस सरकारी यंत्रणाचे दुर्लक्ष जबाबदार आहे. रायकर यांना वेळीच उपचार मिळाले असते तर  त्यांचा  जीव वाचला असता. मात्र बेजबाबदार प्रशासनाच्या हलगर्जीपणाने पत्रकाराचा जीव  गेला. याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी तसेच रायकर यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी  मागणी  पत्रकार  सेवा  संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांनी केली.

रायकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राहुरी शहरातील संत गाडगेबाबा आश्रम शाळा येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. वाडेकर म्हणाले, लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असणार्‍या पत्रकाराचा प्रशासकीय यंत्रेणेमुळे जीव गेला आहे. योग्य व नि:पक्षपाती चौकशीची मागणी उपस्थित पत्रकारांनी केली.

राहुरी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष आर. आर. तनपुरे, रमेश बोरुडे, मनोज साळवे, सचिन ठुबे, मुख्याध्यापक जगन्नाथ सुर्यवंशी आदींनी रायकर यांना श्रध्दांजली अर्पण केली. 

यावेळी जालिंदर ढोकणे, संतोष जाधव, अशोक मंडलिक, राजेंद्र पवार, बंडू म्हसे, सतीश फुलसौंदर, कैलास देठे, मिनाष पटेकर, समीर शेख, बाळकृष्ण वाघ, दीपक दातीर, कमलेश विधाटे, सुनील सात्रळकर, अधीक्षक अजबराव गोळे, डॉ. सुभाष मोरे, अतिक बागवान, सुनील बग्गन, आरती नानकदे,  मुख्याध्यापक गजानन खर्चे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post