नांदगाव येथे पावसामुळे पिके झाली आडवी


नगर, (दि.12 सप्टेंबर) : नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव (ता.नगर ) परिसरात अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. या पिकाचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी सरपंच सुनिता सरक प्रशासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



नादगाव (ता.नगर) परीसरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. तसेच जोरदार वादळामुळे पिके पुर्णपणे आडवे झाले आहे. उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस, कपाशी, बाजरी, मका, आणि तूर इत्यादी पिके भुईसपाट झाल्यामुळे शेतकर्‍यांना हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे गेला आहे. यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा अडचणीत सापडला आहे.

 
नुकतीच नुकसान झालेल्या पिकांची पाहणी सरपंच सुनिता सरक यांनी केली आहे. या पिकाचे पंचनामे करण्या यासंदर्भात मतदार संघाचे आ.निलेश लंके व खासदार. सुजय विखे यांच्याशी चर्चा केली आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांना तात्काळ परिस्थिती पाहणी करून संबंधित अधिकार्‍यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यास सांगितले. अशी माहिती सरपंच सुनिता सखाराम सरक यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post