प्रेमदान चौकात जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय


नगर, (दि.21 सप्टेंबर) : प्रेमदान चौकाजवळ गेल्या चार दिवसांपासून जलवाहिनी फुटली असून, लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाऊस सतत सुरू असल्याने वाहणारे पाणी पावसाचे की फुटलेल्या जलवाहिनीचे, हे समजत नसल्याने नागरिकही तक्रार करत नव्हते.


प्रेमदान चौकाजवळ ही जलवाहिनी फुटलेली आहे. गेल्या चार दिवसांपासून हे पाणी चौकातून एस्सार पेट्रोल पंपाच्या दिशेने वाहून जात आहे. यामुळे चौकापासून एस्सार पेट्रोलपंपापर्यंत जाण्यासाठी या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.

पाण्याबरोबर मातीही वाहून आल्याने वाहने घसरत असून, त्यामुळे किरकोळ अपघातही होत आहेत. तातडीने जलवाहिनी दुरूस्ती करून नागरिकांना होणारा त्रास आणि पाण्याचा अपव्यय वाचविण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post