माझी तब्येत बरी आहे, तुम्हीही स्वत:ची काळजी घ्या : तनपुरे

नगर, (दि.13 सप्टेंबर) :  महाराष्ट्र विधान मंडळाचे अधिवेशन 7 सप्टेंबरपासून सुरू झाले. त्या पाश्‍वभूमीवर विधान मंडळात प्रवेशासाठी कोरोना टेस्ट करणे आवश्यक होते. म्हणून मी देखील माझी कोरोना टेस्ट केली.

त्यामध्ये मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आल्याने मी मुंबईलाच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत असून माझी तब्येत ठिक आहे.

सर्व नागरिकांनी स्वत:ची व विशेषत: आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व राज्याचे मदत व पुनर्वसन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघातील सर्व जनतेला केले.

तसेच माझी तब्येत चांगली असून मला सध्या कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे कोणीही काळजी करू नये, असेही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post