ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रशांत कांबळे यांचे निधन


नगर, (दि.16 सप्टेंबर) :  ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे उर्फ पांड्या (वय- 49) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्यासह सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

शालेय जिवनात स्नेहसंमेलनापासून त्यांनी सुरू केलेली नाट्य कारकिर्द पुढेही कायम होती. विविध भूमिका करतानाच प्रकाश योजनेचे कामही ते चोखपणे करत. बॅकस्टेजच्या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदार्या ते सांभाळत.

अभिनय, दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, संगीत आदी कामे त्यांनी विविध नाट्य स्पर्धांमध्ये चोखपणे केली. राज्य नाट्य स्पर्धेतील अंतिम फेरीत ‘याचक’ आणि ‘तर्पण’ या नाटकासाठी त्यांना रोप्य पदक मिळाले होते.

गणेशोत्सवातही विविध आरास स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेत प्रकाश योजना केली होती. विविध लघुपट, नागराज मंजुळे यांच्या पिस्तुल्या चित्रपटासह फॅन्ड्री, गुगलगाव, गणवेश या चित्रपटात, तसेच दक्षता, क्रामई डायरी आदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांच्या पश्‍चात वयोवृद्ध आई आहे.

Post a Comment

Previous Post Next Post