जुगार खेळणार्‍यांवर पोलिसांची कारवाई

 
 
नगर, (दि.13 सप्टेंबर) :  तिरट नावाचा जुगार खेळणार्‍या राहुरीतील 6 जुगार्‍यांना राहुरीच्या पोलिसांनी पकडून 3 हजार 120 रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी मिळालेल्या निनावी खबरेवरून गुरुवारी दुपारी 4 च्या सुमारास राहुरीचे पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने जुने बस स्थानक परिसरात छापा टाकून ही कारवाई केली.

पोलीस आल्याचा सुगावा लागताच जुगार्‍यांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला. कॉन्स्टेबल रविंद्र मेढे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून 6 जुगार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास कॉन्सटेबल शेख करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post