युवा उद्योजक स्वप्नील पाठक यांचा प्रवास युवकांसाठी प्रेरणादायी

नक्षत्र दूध डेरीच्या उद्घाटनानिमित्त काँग्रेसचे 

शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे प्रतिपादन


नगर, (03 सप्टेंबर) : युवा उद्योजक स्वप्नील पाठक यांनी अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन स्वबळावरती स्वतःचा व्यवसाय सुरु केला. व्यवसायाचा विस्तार करत असताना त्यांनी सुरू केलेल्या नक्षत्र दूध डेअरी मुळे समाजातील इतर युवकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केला आहे.

सावेडी उपनगरामध्ये नव्याने सुरू झालेल्या नक्षत्र दूध डेअरीचे उद्घाटन काळे यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

काळे बोलताना म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात युवकांची बेरोजगारीची समस्या आ वासून उभी राहिली आहे. अशा नकारात्मक वातावरणामध्ये देखील धाडस करत स्वप्नील पाठक यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करत असताना डेअरी सारख्या लोकांना लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या व्यवसायामध्ये पदार्पण केले आहे.  हे  निश्चितच कौतुकास्पद आहे.

काळे पुढे म्हणाले की, पाठक हे नेहमीप्रमाणे या व्यवसायामध्ये देखील त्यांच्या ग्राहकांना उत्तम आणि दर्जेदार सेवा देतील याचा मला विश्वास आहे. त्यांच्यातील जिद्द आणि चिकाटी यातून युवकांना प्रेरणा देणारी आहे. त्यांचे वडील राजेंद्र पाठक यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि मार्गदर्शन यामुळे त्यांना अल्पावधीत मध्ये घवघवित यश मिळवता आले आहे. ही देखील आनंदाची बाब आहे.

यावेळी राजेंद्र पाठक, सुनिता पाठक, स्नेहल काळे, सतीश आचार्य आदींसह परिवारातील स्नेही, मित्र परिवाराची उपस्थिती होती.



Post a Comment

Previous Post Next Post