जनाधार संघटनेचा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या


नगर, (दि.08 सप्टेंबर) : नगर तालुक्यातील निंबोडी येथील मल्हार निंबोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या 120 सभासदांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. राजकीयद्वेषापोटी कर्ज प्रकरणे प्रलंबीत ठेवण्यात आल्याचा आरोप जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत उपनिबंधक कार्यालयात संघटनेच्यावतीने कार्यालयातच ठिय्या आंदोलन करून लवकरात लवकर कर्ज मंजुर करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
 

यावेळी भैरवनाथ बेरड, जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, माजी सरपंच संदीप पानसरे, जयराम बेरड, अंबादास बेरड, शहनवाज शेख, अमित गांधी, गणेश निमसे, अजय सोळंकी , गणेश काकडे सभासद व पदाधिकारी उपस्थित होते. सहकारी संस्थेच्या 120 सभासदांनी संस्थेच्या उपविधी प्रमाणे व सहकारी बँकेच्या धोरणानुसार कर्ज मिळण्यासाठी सर्व कागदपत्रे दिली.

वेळोवेळी कर्जाची मागनी केली. मात्र, संस्थेने राजकीयद्वेषातून कर्ज प्रकरणे मंजूर केली नाहीत. संस्थेने वेळकाढूपणा केला आहे. त्यामुळे 120 सभासद कर्जापासून वंचित राहिलेले आहे. तर कर्ज मिळण्याची मुदत संपत आलेली असून, लवकरात लवकर कर्ज द्यावे, अशी मागणी उपनिबंधक के.आर. रत्नाळे यांच्याकडे करण्यात आली आहे.

नगर तालुका उपनिबंधक के.आर. रत्नाळे यांनी संस्थेला 24 तासात मिटिंगचा अजेंडा जाहीर करून सदर प्रकरण मार्गी लावण्याचे पत्र पाठविले आहे. अन्यथा प्रशासकीय कार्यवाही करण्याचा इशारा दिला होता तरीदेखील काही कारवाई झाली नाही त्यामुळे जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

नगर तालुका उपनिबंधक के. आर. रत्नाले व जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी लेखी पत्र दिले की 18 तारीख पर्यंत सोसायटीने कर्ज वाटप न केल्यास 19 तारखेला आम्ही स्वतः प्रशासक नेमून शेतकर्‍यांचे प्रलंबित खरीप कृषी कर्ज वाटप सुरळीत करून देण्यासाठीचे लेखी आश्‍वासन पत्र दिले आहे त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post