मित्रांच्या मदतीने पित्याचा खून : निघोज येथील खूनाचे रहस्य उलगडले


नगर, (दि.17 सप्टेंबर) : निघोज (ता.पारनेर) खून प्रकरणाचे रहस्य पोलिसांनी उलगडले असून मित्रांच्या मदतीने मुलानेच पित्याचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी प्रदीप सतीश कोहकडे (रा.कारेगाव, ता. शिरूर) त्याचे मित्र हर्षल सुभाष कोहकडे, श्रीकांत बाळू पाटोळे (दोन्ही रा. कारेगाव) व त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


दि.27 ऑगस्ट रोजी निघोज परिसरातील कुकडी नदीपात्रात धान्याच्या कोठीमध्ये एक अनोळखी मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांना धागेदोरो मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून कारेगांव येथील तांत्रिक व गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरुन मयताच्या मृत्यूबाबत त्याच्या मुलाकडे सखोल चौकशी केली. सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी करताच त्याने वडील आईला योग्य वागणूक देत नसल्याने व घरभाड्याचे व शेतीचे असलेले सर्व पैसे हे वडील त्यांचे अनैतिक संबध असलेल्या दुसर्‍या महिलेवर खर्च करत असल्याचे सांगत यावरुन त्याचे वडीलांशी नेहमी वाद होत असल्याचे सांगितले.



ऑगस्ट रोजी सायंकाळी त्याचे वडीलांशी वाद झाले. तसेच आईला मारहाण केल्याचा राग मनात धरुन मयताचा मुलगा प्रदीप सतिष कोहकडे (रा.कारेगांव, ता.शिरुर, जि.पुणे) याने त्याचे मित्र हर्षल सुभाष कोहकडे, श्रीकांत बाळू पाटोळे (दोघेही रा.कारेगांव) यांच्यासह इतर दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने मयताचे घरामध्येच डोळ्यात मिरचीची पूड टाकून, तोंड दाबून व कापडी पट्टयाने गळा आवळून खून केल्याचे सांगितले.

पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश गवळी, वाघ, उपनिरीक्षक पदमने, बोत्रे, पोहेकॉ जाकीर शेख, निकम, चौगुले, खाडे, पाचारणे, शिंदे, राठोड  दिवटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post