नगर- मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी कृती समितीच्या वतीने मुंडन आंदोलन


देवळाली प्रवरा , (दि.19 सप्टेंबर) :  नगर- मनमाड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची पुरती वाट लागल्याने रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी राहूरी फॅक्टरी येथे नगर- मनमाड रस्त्यावर उतरून नगर - मनमाड रस्ता कृती समितीच्यावतीने मुंडन आंदोलन करण्यात आले.


नगर मनमाड रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्याच्या दुरुस्तीकडे  लोकप्रतिनिधी व प्रशासन  याकडे  सातत्याने काना डोळा करत आहे.  आज सकाळी नगर-  मनमाड  रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या कारभारावर टीका केली. रोडवर पडलेल्या खड्ड्यात युवकांनी आपले डोक्याचे केस काढून मुंडन आंदोलन केले.


यावेळी वसंत कदम, प्रमोद विधाटे, सचिन तारडे, आशपाक सय्यद, अनिल वाणी, प्रभाकर खांदे, अजिंक्य कोळगे, नितीन मोरे आदींनी मुंडन केले तर  क्रांतिसेना पक्ष, मराठा एकीकरण समिती, मनसे राहुरी फॅक्टरी, संघर्ष चालक मालक संस्था, स्वराज्य चालक मालक संघटना, प्रहार चालक मालक संघटना, छावा संघटना, नाभिक संघटना राहुरी फॅक्टरी, वाहन चालक सामाजिक संघ, वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान, राजे छत्रपती संघटना,अंबिकानगर मित्र मंडळ, मनवीसे  राहुरी फॅक्टरी,  वाणी मळा मित्र मंडळ इतर  सामाजिक संघटना यांनी सहभाग घेऊन पाठींबा दर्शविला.

Post a Comment

Previous Post Next Post