तळेगाव दिघे (दि.01 सप्टेंबर) : येथील कृषीकन्या व लोणी येथील कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी प्राजक्ता संपत दिघे हिने शेतात जावून तळेगाव दिघे व निळवंडे येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेती विषयक मार्गदर्शन केले.
कृषिकन्या प्राजक्ता हिने तळेगाव दिघे व निळवंडे परिसर शेतकऱ्यांच्या शेतात जात भेेटी घेतल्या. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आधुनिक शेतीसाठी मोबाइल ॲप व त्याचा वापर तसेच फवारणी करताना घ्यावयाची काळजी, रोग व किडीपासून शेतीचा बचाव, जनावरांचे वाढते आजार व नियंत्रण, डाळिंब पिकावरील रोग व कीडी बाबत मार्गदर्शन केले.
याबाबत तिचे तळेगाव दिघे व निळवंडे सरपंच, ग्रामसेवक यांनी कौतुक केले.
Tags:
Ahmednagar