पुरूष हक्क संरक्षण समिती जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.कराळे


नगर, (दि.01 सप्टेंबर) : पुरूषांच्या बरोबरच स्रियांच्या हक्काचे संरक्षणासाठी लढणार्‍या व कुटुंब व्यवस्था टिकावी म्हणून 1996 पासुन काम करणार्‍या पुरूष हक्क संरक्षण समिती च्या जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.शिवाजी अण्णा कराळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

त्याच बरोबर महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष यांच्याही नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. नाशिक येथे पुरूष हक्क समिती च्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली. त्या बैठकीत पुरूष हक्क समितीच्या यापुर्वी झालेल्या 22 राज्यस्तरीय अधिवेशनाचा आढावा घेण्यात आला.

त्यानंतर केंद्रीय समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुनिल घाडगे आणि सचिव अ‍ॅड. धर्मेंद्र चव्हाण यांनी अहमदनगरच्या जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. शिवाजी कराळे यांची फेरनिवड केली.

अ‍ॅड. कराळे हे गेल्या वीस वर्षांपासुन पुरूष हक्क समितीमध्ये काम करत आहेत. ज्या प्रमाणे महिलांना संरक्षण मिळावे म्हणून अनेक कायदे निर्माण केले आहेत तसे कायदे पुरूषांना संरक्षण मिळावे म्हणून तयार केले नाहीत.

हे लक्षात घेऊन 1996 मध्ये नाशिक येथे पुरूष हक्क संरक्षण समितीची स्थापना केली आणि कायदेशीर त्याचे रजिस्ट्रेशन केले. सध्या तीस जिल्ह्यात संस्था कार्यरत आहेत. आता पर्यंत संघटनेचे 22 राज्यस्तरीय अधिवेशन झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post