सत्यजीत तांबे राज्याच्या राजकारणातील वजनदार नेते : आमदार अमित झनक


नगर, (दि.12 सप्टेंबर) :  सत्यजीत (दादा) तांबे हे युवक काँग्रेसच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष या नात्याने संबंध राज्यभर संघटना बांधणीसाठी सातत्याने फिरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याबरोबरच नगर शहर आणि जिल्ह्यामध्ये युवकांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. तांबे हे राज्याच्या राजकारणातील वजनदार नेते असून त्यांचे भविष्य हे अत्यंत उज्वल असल्याचा विश्‍वास काँग्रेसचे  रिसोड  विधानसभा  मतदारसंघाचे  युवा  आमदार  अमित  झनक  यांनी व्यक्त केला आहे.


अहमदनगर येथे युवक काँग्रेसच्या रोजगार दो अभियानानिमित्त आले असता त्यांनी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व शहर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख पदाधिकार्‍यांशी संवाद साधताना आमदार झनक बोलत होते.


आमदार झनक पुढे म्हणाले की, सध्या देशात कोरोनाच्या संकटाने भयावह रूप धारण केले आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. परंतु कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेसाठी फक्त कोरोना जबाबदार नसून मोदी सरकारची आर्थिक धोरणे जबाबदार आहेत. परंतु मोदी सरकार या सगळ्या बाबींचे खापर कोरोनावर फोडून स्वतःची सुटका करून घेऊ पाहत आहे. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणामुळे देशामध्ये दोन कोटींपेक्षा जास्त तरुणांना बेरोजगार व्हावे लागले. आजचा युवावर्ग रोजगार गेल्यामुळे हवालदिल झाला आहे. मोदी सरकारने चुनावी जुमले करताना मोठ-मोठे आश्‍वासन दिले होते. परंतु त्यातल्या कुठल्याच आश्‍वासनाची पुर्तता त्यांनी पूर्ण केली नसल्याचा आरोप झनक यांनी यावेळी केला.

 

यावेळी चंद्रकांत उजागरे, प्रदेश युवक सरचिटणीस प्रशांत उगले, युवक शहर अध्यक्ष मयूर पाटोळे, विद्यार्थी शहराध्यक्ष दानिश शेख, मोहसीन शेख, अमित भांड, योगेश काळे, डॉ. साहिल सादीक, विजय कळमकर, गणेश भोसले, सागर जाधव आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आभार चंद्रकांत उजागरे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post