अहमदनगर जिल्ह्यात आज ९०६ बाधितांची रुग्णसंख्येत भर

आतापर्यंत २८५१२ रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.३२ टक्के

नगर, (दि.16 सप्टेंबर) :अहमदनगर  जिल्ह्यात आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९०६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४७६८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०३ आणि अँटीजेन चाचणीत ४०७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४५ संगमनेर ०५, राहाता ०१, नगर ग्रामीण १७, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०१,नेवासा ०७, श्रीगोंदा ०४, अकोले ०१, राहुरी ०२, जामखेड ०१, मिलिटरी हॉस्पिटल ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४०३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १६३, संगमनेर १०, राहाता २३,पाथर्डी ०५, नगर ग्रामीण ५४, श्रीरामपुर २१,  कॅंटोन्मेंट ०९, नेवासा १९,  श्रीगोंदा ०७, पारनेर २९, अकोले १३, राहुरी ३१,शेवगाव ०३,कोपरगाव ०७, जामखेड ०६ आणि कर्जत ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ४०७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा १७, संगमनेर २९, राहाता ४१, पाथर्डी ३०, नगर ग्रामीण १३, श्रीरामपूर १८,  कॅंटोन्मेंट ०४, नेवासा ६४, श्रीगोंदा २२, पारनेर १२, अकोले ०९, राहुरी ६६, शेवगाव २४, कोपरगाव २९, जामखेड १९ आणि कर्जत १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ८४० रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २५०, संगमनेर ६२, राहाता ६९, पाथर्डी ०५, नगर ग्रा ५६, श्रीरामपूर ७८, कॅन्टोन्मेंट१४, नेवासा ४०, श्रीगोंदा ३७, पारनेर २५, अकोले २७,  राहुरी ४२, शेवगाव ४६, कोपरगाव २१,जामखेड ३२, कर्जत २८, मिलिटरी हॉस्पिटल ०८अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: २८५१२

*उपचार सुरू असलेले रूग्ण:४७६८

*मृत्यू:५३३*

*एकूण रूग्ण संख्या:३३८१३

 

 (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

 दिनांक: १६ सप्टेंबर २०२०,रात्री ७ वा

 

सार्वजनिक ठिकाणी संपर्क आणि गर्दी टाळा

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावूनच बाहेर पडा

  

"प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या"

 

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

 


Post a Comment

Previous Post Next Post