मुंबई, (दि.07 सप्टेंबर) : शिवसेनेचे माजी मंत्री दिवंगत अनिल राठोड यांना विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी
विधानसभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी
शोकप्रस्ताव मांडला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, माझा अजूनही विश्वास बसत नाही की अनिल राठोड यांना श्रध्दांजली वाहवी लागतेय. राठोड हे शिवसेनेचे कट्टर सैनिक होते.
नगरमध्ये त्यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख अशा जबाबदार्या पार पाडल्या. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कितीही मोठा संघर्ष करण्याची त्यांची तयारी असायची. 25 वर्षे ते आमदार होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही
शोकप्रस्तावावर बोलताना दिवंगत अनिल राठोड यांना श्रध्दांजली अर्पण केली.
फडणवीस म्हणाले की, अनिल राठोड हे सर्वसामान्यांचे भैया होते. त्यांचे
अचानक जाणे धक्कादायक होते.
Tags:
Maharashtra