माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर संघर्ष केला. त्यांच्या निधनाने शिक्षक चळवळीचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी व्यक्त केली.
शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तीमत्व व शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले मोते सर यांच्या निधनाने मोठे दु:ख होत आहे. त्यांनी नेहमीच शिक्षकांच्या हितासाठी कार्य केले असल्याचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले.
तसेच वेबीनारवर माजी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षक आमदार नागो गाणार, आमदार संजय केळकर यांनी आपल्या भावना व्यक्त करुन मोते सरांना श्रध्दांजली अर्पण केली.
या शोकसभेत माजी आमदार भगवानराव साळुंखे, संजीवनीताई रायकर, बाबासाहेब काळे, निरंजन डावखरे, सरकार्यवाह नरेंद्र वातकर, राज्य कोषाध्यक्ष किरण भावठाणकर तर अहमदनगर मधून बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, चंद्रकांत चौगुले, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल सर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, देवकर सर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, उकीर्डे सर, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, थोरे सर, प्रदीप बोरूडे, युनूस शेख, ईकबाल काकर आदिंसह शिक्षक परिषदेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.