राष्ट्रवादीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची गोणी ओतून कांदा निर्यात बंदीचा निषेध

शेतकरी टिकेल तर शेती पिकेल...,

शेतकर्‍यांची लूट हीच मोदी सरकारची भूकच्या घोषणा

 

नगर, (दि.18 सप्टेंबर) : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव कोसळून शेतकरी अडचणीत सापडला असताना या शेतकरी विरोधी निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मार्केटयार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्या गोणी खाली ओतून निषेध नोंदविण्यात आला. शेतकरी टिकेल तर शेती पिकेल..., शेतकर्‍यांची लूट हीच मोदी सरकारची भूक... आदि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन कांदा निर्यात बंदी त्वरीत उठविण्याची मागणी करण्यात आली.

आमदार संग्राम जगताप व आमदार अरुणकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली फिजीकल डिस्टन्स व नियमांचे पालन करुन झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, अमोल कांडेकर, विजय बोरुडे, मयुर विधाते, संतोष ढाकणे, फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दिपक खेडकर, शहानवाझ शेख, सुफियान शेख, गणेश बोरुडे, उषा सोनटक्के, किरण कटारिया, शितल गाडे, विनोद खैरे, अक्षय घोरपडे आदि सहभागी झाले होते.

देशात कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण होऊन याचा फटका कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. मात्र या निर्याबंदीमुळे कांद्याला भाव मिळणे बंद झाले आहे. कोरोनाच्या संकटकाळाचा फटका शेतकर्‍यांना देखील बसला असून, शेतकरी अडचणीत असताना या निर्णयामुळे तो अधिक अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवित असल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे राष्ट्रवादीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

प्रा.माणिक विधाते म्हणाले की, भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीला चालना देण्याऐवजी केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकर्‍यांना देशोधडीस लावण्याचे काम करीत आहे. शेतकर्‍यांच्या अन्न-धान्याला हमीभाव नाही. कांद्याला चांगले भाव मिळत असताना केंद्र सरकारने निर्यातबंदी करुन त्याला संकटात आनले आहे. केंद्र सरकारने त्वरीत निर्यातबंदी उठवावी व कांदा उत्पादक शेतकर्‍यांना न्याय देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post