इतर मागासवर्गीयांना लघुउद्योगासाठी कर्ज पुरवठा अर्ज करण्याचे ओबीसी महामंडळाचे आवाहन


नगर, (दि.15 सप्टेंबर) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या अहमदनगर जिल्‍हा कार्यालयाच्या वतीने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी उदिदष्ट प्राप्त झाले असून महामंडळाच्या या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.



यामध्ये व्याज परतावा कर्ज योजना १० लाखापर्यंत ७० प्रकरणे, बीज भांडवल कर्ज ७० प्रकरणे, बचतगटासाठी गटकर्ज व्याज परतावा योजना (१० ते ५० लाख) १२ प्रकरणे एवढे उदिष्ट कार्यालयास ठरवून देण्यात आले आहे. त्यासाठी लाभार्थीने शासनाच्या अधिकृत www.msobcfdf.org या वेबपोर्टलवर अर्ज करणे आवश्‍यक आहे. 

 

त्यासोबतच महामंडळाकडून एक लाखाच्या बिनव्याजी थेट कर्ज योजने अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील शंभर बेरोजगार तरुणांना लघुउद्योगासाठी वरील कर्ज योजनेचा लाभ घेता येणार आहे, त्यासाठी अर्जदाराचा सीबील क्रडिट स्कोअर ५०० असणे बंधनकारक आहे. 

 

तरी इच्छुक लाभार्थीने अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, सारसनगर, साई सोना अपार्टमेंट जवळ अहमदनगर. येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post