अहमदनगर जिल्ह्यात नव्या १३६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर

 

नगर, (दि.14 सप्टेंबर) : अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३६६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४६७७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २७५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७२० आणि अँटीजेन चाचणीत ३७१ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७०, संगमनेर ३६, राहाता ०७, पाथर्डी ०९, नगर ग्रामीण २१, श्रीरामपूर ०९, कॅंटोन्मेंट १६, नेवासा २६, पारनेर १९, अकोले १४, राहुरी १५,  कोपरगाव १९, जामखेड ०८, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ७२० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २७२, संगमनेर १३,, राहाता ७३, पाथर्डी १८, नगर ग्रामीण ८४, श्रीरामपुर ५८,  कॅंटोन्मेंट ११, नेवासा ३४, श्रीगोंदा १४, पारनेर ३४,अकोले ०५, राहुरी ५७, शेवगाव ०९, कोपरगांव १५, जामखेड १८ आणि कर्जत ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३७१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ३५, संगमनेर २६, राहाता ४४, पाथर्डी ३४, नगर ग्रामीण ०१, कॅंटोन्मेंट १०, नेवासा १७, श्रीगोंदा २४, अकोले ३९, राहुरी ३८, कोपरगाव ४१, जामखेड ३२ आणि कर्जत ३० अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ८३५ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये,मनपा २५२, संगमनेर ८२, राहाता ५१,पाथर्डी ३६,नगर ग्रा ५१, श्रीरामपूर ५८, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा ४५, श्रीगोंदा ३६, पारनेर २४, अकोले ३५, राहुरी ४८, शेवगाव ०६, कोपरगाव १७, जामखेड ३८, कर्जत ३३, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: २६९९१

*उपचार सुरू असलेले रूग्ण:४६७७

*मृत्यू:४९५

*एकूण रूग्ण संख्या:३२१६३

 

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक: १४ सप्टेंबर २०२०, रात्री ८ वा
 

सार्वजनिक ठिकाणी संपर्क आणि गर्दी टाळा

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावूनच बाहेर पडा

  

"प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या"

 

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका
 


Post a Comment

Previous Post Next Post