भिंगारमध्ये दागिन्यासह रोख रक्कम चोरीला

नगर, (दि.05  सप्टेंबर) : भिंगार येथील नागरदेवळे या ठिकाणी राहत्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करुन चोरट्यांनी 37 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला आहे. याबाबत भिंगार कॅपमध्ये छोटु मळुजी पाटोळी यांनी फिर्याद दाखल केली आहे.


पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नागरदेवळे येथे राहणारे
छोटु मळुजी पाटोळे (वय,47) रा.माधवबाग, पारिजात, नगर यांच्या प्लॅटचे सेफ्टी दरवाज्याचा कडी कोयंडा तोडुन चोरट्यांनी घरात प्रवेश केले.


घरातील लोखंडी कपाटात व शोकेशमध्ये ठेवलेले 15 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाची चैन, 7 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, 7 हजार रुपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असलेले मंगळसुत्र, 3 हजार रुपये किंमतीचे व 3 ग्रॅम वजनाची सोन्याचे कानातले, 5 हजार 200 रुपये रोख असा सुमारे 37 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले आहे.


चोरीची माहिती समजताच भिंगर कँम्पचे सहाय्यक पोलिस निरिक्षक पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलिस नाईक गोर हे करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post