देवळाली प्रवरा, (दि.09 सप्टेंबर) : संपूर्ण देशांसह तसेच महाराष्ट्र कोरोना आजाराच्या महामारीने हावालदिल झालेला असताना सध्या कोरोना आजाराच्या उपचारासाठी अनेक लोकांना (रुग्णांना) अहमदनगर जिल्हयात नगर - मनमाड राज्य महामार्गावर जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. या खराब रस्त्यामुळे इतर आजाराच्या अनेक रुग्णांनी रुग्णवाहीका दवाखान्यात वेळेवर न पोहचल्यामुळे अखेरचा श्वास देखील घेतला आहे. या राज्य महामार्गावर अनेक मोठमोठी अपघात होऊन वाहनांची मोठया प्रमाणामध्ये नुकसाने झालेली आहे. त्याचबरोबर अनेक निष्पाप लोकांचा अपघाती मृत्यु होत असून काहींचे तर सुखीसंसारे उध्वस्त झालेली आहे.
'सबका साथ सबका विकास' म्हणणाऱ्या या केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्हा मात्र विकासाच्या बातीत खड्ड्यात घातला असल्याचे बोलके जिवंत चित्र नगर- मनमाड राज्य महामार्ग पाहील्यावर लक्षात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जागतिक बॅक प्रकल्पाच्या गलथान कारभारामुळे तसेच मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता आणि ठेकेदाराच्या आशिर्वामुळेच निकृष्ट दर्जेचे मटेरियल वापरून ओईल मिक्षित डांबर वापरून नगर - मनमाड राज्य महामार्गाचे काम रामभरोसे केल्याचे निदर्शनास येत आहे.
नगर - मनमाड राज्य महामार्गाची देखभाल दुरुस्ती म्हणजे नुसती थातूरमातुर मलमपट्टी करून दिवसाढवळ्या सामान्य नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करुन निकृष्ट्र दर्जेच्या कामाची मलई खाऊन अंधळ दळतय कुत्र पिठ खातय असा प्रकार आहे.
Tags:
Ahmednagar