टिव्ही 9 चे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे निधन


नगर, (02 सप्टेंबर) : टिव्ही 9 वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच कोरोनामुळं पुण्यात निधन झाले आहे. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्यापश्‍चात पत्नी, दोन मुले, आई  वडील असा परिवार आहे. पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने पांडुरंग रायकर यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. 
 
रायकर यांनी अहमदनगरमध्ये वृत्तवाहिनी प्रतिनिधी म्हणून काम केले तसेच गेल्या काही वर्षांपासून ते टिव्ही 9 चे प्रतिनिधी म्हणून पुण्यात काम पाहत होते. रायकर यांच्या निधनामुळे पत्रकार क्षेत्रामधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. 
 
युवक काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ.रोहित पवार, आ.आशुतोष काळे यांनी रायकर यांना श्रध्दांजली अर्पण करीत माध्यमांच्या प्रतिनिधींना कर्तव्य बजावताना स्वत:ची व परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

पांडुरंग रायकर यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.

Post a Comment

Previous Post Next Post