अहमदनगर जिल्हयात आज वाढले 867 नवे रुग्ण

नगर, (दि.04 सप्टेंबर) : आज जिल्ह्यात 549 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 20 हजार 510 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 84.74 टक्के इतके झाले आहे तर काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत 867 नवे रुग्ण आढळले आहेत. 


यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 3344 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 282,  अँटीजेन चाचणीत 322 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 263 रुग्ण बाधीत आढळले.

 
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 195, संगमनेर 10, राहाता 01, पाथर्डी 05, नगर ग्रामीण 22, श्रीरामपूर 01, कँटोन्मेंट 06, नेवासा 02, श्रीगोंदा 11, पारनेर 03, राहुरी 02, शेवगाव 13, कोपरगाव 06, कर्जत 01,  इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज 322 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 62,  राहाता 40 , पाथर्डी 43, श्रीरामपूर 12, कँटोन्मेंट 09,  नेवासा 46, श्रीगोंदा 22, पारनेर 19, राहुरी 05, शेवगाव 16, कोपरगाव 11, जामखेड 21 आणि कर्जत 16 अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 263 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 80, संगमनेर 14, राहाता 35, पाथर्डी 05,  नगर ग्रामीण 19, श्रीरामपुर 30,  कॅन्टोन्मेंट 07, नेवासा 26, श्रीगोंदा 03,  पारनेर 22, अकोले 01, राहुरी 09, शेवगाव 02,  कोपरगांव 05, जामखेड 04 आणि कर्जत 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज 549 रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा 239 संगमनेर 36, राहाता 28, पाथर्डी 14, नगर ग्रा.15, श्रीरामपूर 39, नेवासा 29, श्रीगोंदा 13, पारनेर 15, अकोले 08, राहुरी 16, शेवगाव 20,  कोपरगाव 34, जामखेड 15 कर्जत 15, मिलिटरी हॉस्पिटल 13 अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या: 20510

*उपचार सुरू असलेले रूग्ण: 3344

*मृत्यू: 349

*एकूण रूग्ण संख्या:24203

 

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
दिनांक: 04 सप्टेंबर 2020, रात्री 7 वा.

 

सार्वजनिक ठिकाणी संपर्क आणि गर्दी टाळा

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावूनच बाहेर पडा

  

"प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या"

 

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

Post a Comment

Previous Post Next Post