दिवसाढवळ्या 50 हजारांचे सोने पळविले : अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा


नगर, (दि.19 सप्टेंबर) : पारनेर तालुक्यातील जवळा येथे गुरूवारी सकाळी 11 वाजता एका गाडीवरून आलेल्या दोन जणांनी आम्ही पोलिस असल्याची खोटी बतावणी करून पावणे दोन तोळ्याचे 50 हजार रूपयांचे दागिने पळविले असल्याची घटना घडली आहे.

यासबंधीची फिर्याद दशरथ उर्फ युवराज रामजी शिंगाडे (वय 66 वर्षे, धंदा शेती, राहणार जवळा, तालुका पारनेर, ही राहणार म्हसे खुर्द, तालुका पारनेर) यांनी दिली असून दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या घटनेत दशरथ शिंगाडे यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किमतीची 13 ग्रॅमची चपटी डिझाईन असलेली सोन्याची चैन व 15 हजार रुपये किमतीची 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकुण 50 हजार रूपयांचा मुद्देमाल घेवून गेले.

त्यामुळे दोन भामट्यांविरोधात फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गुजर करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post