5 फुटी कोब्रा जातीचा नाग सर्पमित्र सांगळेंनी पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडला


देवळाली प्रवरा, (दि.09 सप्टेंबर) : येथील शेटेवाडी भागात एका घरात 5 फुटी कोब्रा जातीचा अतिविषारी  नाग सर्पमित्राने पकडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

शेटवाडी येथील संदीप वाबळे यांच्या घरात दुपारी 2 च्या सुमारास अतिविषारी जातीचा नाग घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

यावेळी चैतन्य अँक्वाचे संदीप भांड यांनी तातडीने सर्पमित्र अभि सांगळे याच्याशी संपर्क साधून याबाबत माहीती दिली.

सर्पमित्र  सांगळे यांनी तातडीने याठिकाणी धाव घेऊन भला मोठा अतिविषारी कोब्रा नाग मोठया शिताफीने पकडला.

या नागाला घरातून बाहेर काढून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. यावेळी  गणेश शेटे , सागर शेटे, महेश पंचमुखे, टिलु शेटे आदीनी सर्पमित्र अभि सांगळे यांचे कौतुक केले.

परीसरात कोठेही सर्प अथवा नाग आढळल्यास घाबरून न जाता 7517558232 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन सर्पमित्र सांगळे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post