जिल्हा रुग्णालयात 300 ऑक्सिजनयुक्त वाढीव बेडची उपलबध्दता व्हावी : शिवसेनेची मागणी


नगर, (दि.21 सप्टेंबर) : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त वाढीव तीनशे बेडची उपलब्धता अतिशय  गरजेची  असून, ती तातडीने करावी, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केली आहे. यासाठी शिवसेनेकडून सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.


शहर शिवसेनेच्या शिष्टमंळाने प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखर्णा यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी माजी महापौर अभिषेक कळमकर, उपजिल्हा प्रमुख गिरीष जाधव, आनंद लहामगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ताभाऊ जाधव, शाम नळकांडे, अक्षय उनवणे, विशाल वालकर, संतोष गेणाप्पा, विजय पठारे, परेश लोखंडे, अभिषेक भोसले आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.


जिल्हा रुग्णालयात उपलब्ध बेडची सुविधा, कोरोना रुग्णांना दिल्या जाणार्‍या सुविधा, यंत्रसामुग्री, आवश्यक असलेली सामग्री, सेवा देताना येणार्‍या अडचणी, रुग्णांच्या व नातेवाईकांच्या तक्रारी आदींबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. काही विषयांबाबत अपुर्‍या माहितीमुळे रुग्णालयाबाबत गैरसमज होत असल्याची माहिती डॉ.पोखरणा यांनी दिली.

 

डॉ.पोखर्णा यांनी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीचा निश्‍चित विचार करुन तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल असे आश्‍वासन शिवसेना शिष्टमंडळाला दिले.

Post a Comment

Previous Post Next Post