किराणा दुकानातून 3 लाखाची चोरी


नगर, (दि.12 सप्टेंबर) :  तालुक्यातील जखणगाव येथे संदीप माधव खेसे (वय 40) यांच्या किराणा दुकानाचा  कडीकायंडा तोडून आत प्रवेश करुन चोरट्यांनी 2 लाख 15 लाख 15 हजार रुपये तसेच 1 लाख 25 हजार रुपयांचा किराणा माल चोरुन नेला आहे.

ही घटना 9 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. खेसे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शंकरसिंह राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलिस नाईक शिंदे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post