यावेळी सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम समवेत केडगाव राष्ट्रवादी अध्यक्ष भरत गारुडकर व नागरिक उपस्थित होते.
रात्री झालेल्या पावसाने या परिसरातील लाईट गेलेली, वैभव कदम यांनी केडगाव महावितरण कार्यालयात फोन करूनही त्याची दखल घेतलेली नव्हती. त्यामूळे वैभव कदम यांनी याचा निषेध करत नागरिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू केले.
जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. त्यानंतर महावितरण’च्या कर्मचार्यांची धावपळ उडाली.
तसेच ठिय्या आंदोलन सुरू असतानाच केडगाव महावितरणचे आभाळे यांनी तात्काळ ठिय्या आंदोलनाची दखल घेत कर्मचार्यांना वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तात्काळ वीज पुरवठा दुरुस्तीची मोहीम सुरू करण्यात आली.
सर्व भागातील वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतरच दोन तासानंतर सदरचे ठीय्य्या आंदोलन मागे घेण्यात आले. वारंवार महावितरण कार्यालयाशी संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याने ठिय्या आंदोलन केले असल्याचे वैभव कदम व भरत गारूडकर यांनी सांगितले.