राज्यातील पोलीस भरतीत मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार : अनिल देशमुख

मुंबई,  (दि.17 सप्टेंबर) : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याच्या पोलीस विभागातील साडेबारा हजार रिक्त जागांच्या भरतीत मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार असल्याची घोषणा केली आहे. 

 

तसेच मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राज्यातील पोलीस भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही. त्यांच्यासाठी 13 टक्के जागा बाजूला काढण्यासाठी कायदेशीर बाबीही तपासणार असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं.

 

दरम्यानच्या काळात राज्य सरकारने 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहे.

 

सरकार पुढील दोन दिवसात मराठा आरक्षणाचा मसुदा घटनापीठासमोर सादर करणार आहे. पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post