मुंबई, (दि.08 सप्टेंबर) : राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग पाहता जास्तीत जास्त चाचण्या होणं आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने आरटीपीसीआर चाचणीचा दर 1 हजार 200 रुपये इतका केला आहे.
सध्या आरटीपीसीआर चाचणीचा दर 2 हजार 200 रुपये इतका होता. त्याआधी तोच दर 4 हजार 500 रुपये इतका होता. मात्र, जून महिन्यात सरकारने कोरोना चाचणीचे दर निम्म्याने कमी केले होते.
एखाद्या रुग्णाच्या घरी जाऊन जर टेस्ट करायची असेल तर पूर्वी 2 हजार 800 रुपये आकारले जात होते. मात्र आता त्यासाठी फक्त 2000 रुपये आकारण्यात येणार आहे, असं राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
त्याचबरोबर कोरोना केंद्रावरुन चाचणीसाठी रुग्णाचे सॅम्पल घेतले तर 1600 रुपये आकारले जाणार आहेत.
Tags:
Maharashtra