नगर, (दि.06 सप्टेंबर) : येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ.एन.जे.पाउलबुधे औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचा निकाल 100 टक्के लागला, अशी माहिती बी.फार्मसी महाविद्यालयाचे परिक्षा अधिकारी प्रा.प्रसाद घुगकर व परिक्षा प्रमुख प्रा.संयोगिता गायकवाड, प्रा.शुभांगी अलभर, प्रा.दुर्गेश पवळे, विभागप्रमुख प्रा. अबीद पठाण यांनी दिली.
कोविडच्या काळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे मुल्यमापन हे त्यांच्या अंतर्गत गुण मुल्यांकाच्या आधारे जाहीर केला आहे. यामध्ये बी. फार्मसीच्या प्रथम वर्षांमध्ये जाधव प्राजक्ता, द्वितीय वर्षांमध्ये माकुडे पायल, तृतीय वर्षामध्ये गायकवाड सृष्टी, तसेच डिप्लोमा प्रथम वर्षामध्ये बोरुडे प्रियंका व बोन्द्रे स्वामिनी यांनी महाविद्यालयात अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकाविला, अशी माहिती प्राचार्या अनुराधा चव्हाण यांनी दिली.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, बी.एड्. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रेखारानी खुराणा, तसेच संस्थेचे सचिव शंकरराव मंगलाराम, रामभाऊ बुचकुल, रामकिसन देशमुख, रघुनाथ कारामपुरी, दादासाहेब भोईटे यांनी अभिनंदन केले.